जाणून घ्या एका क्लिकवर, नेमकं यावर्षी काय महागणार आणि काय स्वस्त होणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | मंगळवारी यंदाचं आर्थिक बजेट(Financial Budget) जाहीर करण्यात आलं आहे. या वर्षीचा जीडीपी(GDP) 6.5 टक्के असणार आहे. जगावर असलेल्या आर्थिक संकटामुळं गतवर्षी सांगितलेल्या अंदाजापेक्षा यावर्षीचा विकास दर कमी असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

सरकारनं जुनी करप्रणाली रद्द केली आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात याचा आपण आढावा घेऊयात.

एलएडी टीव्ही, कॅमेरा लेन्स, मोबाईल, टीव्ही या इलेक्ट्रिक वस्तूंसह इलेक्ट्रिक गाड्यादेखील स्वस्त होणार आहेत. तसेच खेळणी आणि सायकलदेखील स्वस्त होणार आहेत.

तर यंदाच्या आर्थिक बजेटनुसार सिगारेट, विदेशी किचन चिमण्या महागणार आहेत. याचसोबत चांदीचे दागिने आणि चांदीचे भांडेदेखील महागणार आहेत.

लग्नसराईचे दिवस असतानाच सोन्याच्या दरातही(Gold Rate) वाढ होणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. तर प्लॅटिनम देखील महागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-