कॅनरा बँकेच्या ग्रहकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ नियमात झाला बदल

नवी दिल्ली | पूर्वी पैसे लागणार असल्यास आपल्याला बँकेत (bank) जाव लागायचं. तेथील भल्या मोठ्या रांगेत थाबांव लागायचं. त्यानंतर त्यासाठी पावती भरुन पैसे काढावे लागायचे, यात खूप वेळ जात असे. त्यामुळे याला पर्याय म्हणून एटीएम कार्डची सुविधा सुरु करण्यात आली होती.

एटीएम (ATM) कार्डमुळे केव्हाही, कोठेही पैसे काढणं शक्य झालं आहे. प्रत्येक बँकेच्या एटीएम चे नियम काही प्रमाणात वेगळं असतात. अनेकवेळा बँका वारंवार निर्णय बदलत असतात. याचा ग्राहकांना कधी फायदा होतो तरी कधी तोटा. आता एका मोठ्या बँकेने त्यांच्या एटीएम च्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

एटीएम कार्ड च्या व्यवहारांबद्दल कॅनरा बँकेने (Canara Bank) काही नियम केले आहे. बँकेने ते त्यांच्या अधिकृत बेवसाइटवर माहिती दिली आहे. तसेच हे नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर ते नियम जाणून घ्या.

कॅनरा बँकेने एटीएम कॅश, पीओसी (POC) तसेच ई-काॅमर्स व्यवहारांसाठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. बँकेने क्लासिक डेबिट कार्डची एटीएम व्यवहार मर्यादा 40,000 वरुन 75,000 प्रतिदिन केली आहे. कार्ड व्यवहारांची सुरक्षादेखील बँकेने वाढवली आहे.

कार्डसाठी दैनिक POC कॅप 2 लाख रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी तो 1 लाख रुपये होता. तसेच क्लासिक कार्ड मध्ये कोणातही बदल करण्यात आला नाही. क्लासिक डेबिट कार्डवर NFC साठीची दैनंदिन व्यवहार मर्यादा पूर्वीसारखीच 25,000 ठेवण्यात आली आहे.

प्लॅटिनम, बिझनेस आणि सिलेक्ट डेबिट कार्डवरील रोख व्यवहार मर्यादा देखील वाढवण्यात आल्या आहेत. 50 हजारांवरुन 1 लाख इतका करण्यात आला आहे. तसेच POS साठी दैनंदिन व्यवहाराची मर्यादा 2 लाखावरुन 5 लाख करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More