बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंकीपाॅक्सच्या ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो ना होतो तोच जगभरात (World) मंकीपाॅक्सने धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपाॅक्सचे 14000 केसेस आढळून आल्या आहेत. भारत देशात सुदैवाने चार केसेस आढळून आल्या आहेत. आता मंकीपाॅक्स ही जागतिक आरोग्य आणिबाणी म्हणून जागतिक आरोग्य संघटननेन (WHO) जाहीर केली आहे. जाणून घ्या काय आहेत मंकीपाॅक्सची (MonkeyPax) लक्षणे.

मंकीपाॅक्सची काही लोकांमध्ये सौम्य लक्षणे असतात, तर इतरांना गंभीर लक्षणे दिसू शकतात. ज्यांना गंभीर आजार किंवा गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो त्यांना लवकर लक्षणे दिसू लागतात. यामध्ये गरोदर स्त्रिया,(pregnant woman) लहान मुले आणि रोगप्रतिकारक शक्ती(immune system) कमी असलेल्याचा व्यक्तीचा समावेश होतो.

मंकीपाॅक्सच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी,स्नायू दुखणे, पाठदुखी, कमी उर्जा आणि सुजलेल्या लिम्फ नोडस (lymph nodes) यांचा समावेश होतो. यासोबत किंवा काही वेळानंतर पुरळ विकसित होते. ही पुरळ (rash) दोन-तीन आठवडे टिकू शकते. ही पुरळ चेहऱ्यावर, हाताचे तळवे,डोळे,तोंड, घसा, मांडीचा सांधा आणि गुद्दवाराच्या (Anus) भागात आढळू शकतात. या जखमांची संख्या हजार पर्यंत असू शकते.

मंकीपाॅक्सची लक्षणे (symptoms) दोन-तीन आठवडे टिकू शकते. स्वत:हून किंवा थोड्याशा औषधोपचार यासारख्या सहाय्यक काळजीने निघून जातात. सर्व जखमांवर कवच पडेपर्यंत किंवा खरूज गळून पडेपर्यत आणि त्वचेचा नवीन थर निर्माण होईपर्यत व्यक्ती संसर्गजन्य (Infectious) राहते. ज्याला मंकीपाॅक्सची लक्षणे किंवा अशा व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीने सेवा प्रदात्याला भेट द्यावी आणि सल्ला घ्यावा.

थोडक्यात बातम्या

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये’, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही ‘या’ गोष्टींची सवय असेल तर सावधान! आरोग्यावर होतील विपरित परिणाम

‘घर नसल्यामुळे पार्कमध्ये झोपायचे’, उर्फीने सांगितली तिच्या संघर्षाची कथा

रणवीरचा ट्रेंड साऊथमध्येही, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट

जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा निर्णय, मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More