….आणि अनुष्का शर्माला पाहून विराट कोहली घाबरला!

मुंबई | अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘परी सिनेमा पाहण्यासाठी गेलेला विराट कोहली अनुष्काला पाहून घाबरला. त्याने ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केलंय. 

लग्नानंतरचा अनुष्का शर्माचा हा पहिलाच सिनेमा होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांसह विराट कोहलीलाही या सिनेमाची उत्सुकता लागली होती. 

कालच्या रात्री मी परी सिनेमा माहिला. माझ्या बायकोनं उत्कृष्ट काम केलंय. गेल्या काही दिवसांत मी पाहिलेल्या सिनेमांपैकी हा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. खरंतर हा सिनेमा पाहताना मी थोडा घाबरलो होतो. अनुष्का तुझा मला अभिमान वाटतो, असं विराटनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.