खेळ

…म्हणून मी ती दमदार खेळी करू शकलो; कोहलीने सांगितलं त्या खास खेळीचं गुपीत!

मुंबई ।  बुधवारी (11 डिसेंबर) मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिजमध्ये तिसरा टी-20 सामना पार पडला. हा सामना भारताने 67 धावांनी जिंकला होता. या सामन्यात विराट कोहलीने दमदार  अर्धशतकी खेळी केली. भारताने या मालिकेत वेस्ट इंडिजला 2-1 ने पराभूत करत दणदणीत विजय मिळवला.

सामन्यादिवशी सगळ्यांचं लक्ष हे विराटच्या खेळीकडे होतं. विराटने या सामन्यात 4 चौकार आणि 7  गगनचुंबी षटकार खेचत 29 चेंडूत  नाबाद 70 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. 11 डिसेंबर या दिवशी विराट  आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे ही खेळी त्याच्यासाठी खूप खास होती, असं सामन्यानंतर विराट म्हणाला.

11 डिसेंबर, 2017 ला इटलीच्या टस्कनी शहरात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. मुंबईतल्या सामन्याच्या दिवशी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता.

दरम्यान, लग्नाचा दुसरा वाढदिवस असल्यामुळे माझ्यासाठी हा एक आनंदाचा दिवस होता, यामुळे माझी आजची खेळी ही अनुष्कासाठी भेट होती, असंही विराट म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या