लाडक्या मित्राला लग्नात गिफ्ट केली कोहलीनं तब्बल ‘इतक्या’ रूपयांची महागडी कार

मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू केएल राहुल(KL Rahul) आणि बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री अथिया शेट्टीनं(Athiya Shetty) २३ जानेवारीला लग्नगाठ बांधली आहे. हे लग्न अगदी थाटामाटात पण मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित पार पडलं.

या लग्नात अनेक क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यात नवविवाहित जोडप्याला अनेक महागडी गिफ्ट्स मिळाली आहेत. त्यातली त्यात विराट कोहलीनं राहुल-अथियाला दिलेल्या गिफ्टनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

केएल राहुल आणि विराट कोहली(Virat Kohali) यांची घट्ट मैत्री आहे हे जगजाहीर आहे. क्रिकेटच्या मैदानात असो किंवा सोशल मीडियावर असो, दोघांची किती घनिष्ठ आणि चांगली मैत्री आहे, हे दिसून येतं.

आता याच मैत्रीखातीर कोहलीनं आपल्या लाडक्या मित्राला त्याच्या लग्नात बीएमडब्लू कार (BMW Car) गिफ्ट दिलीय. या कारची किंमत तब्बल 2.17 कोटी रूपये आहे. आता कोहलीनं राहुलला दिलेल्या या गिफ्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

कॅप्टन कुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनंही राहुलला महागडं गिफ्ट दिलं आहे. धोनीला बाईकची खूप आवड आहे, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. धोनीकडं विविध बाईक्सचे कलेक्शनही आहे.

म्हणूनच धोनीनं राहुलला लग्नात निन्जा बाईक गिफ्ट दिली आहे. या बाईकची किंमत सुमारे 80 लाख रूपये आहे. खास गोष्ट म्हणजे ही बाईक धोनीकडं असलेल्या बाईक्स कलेक्शमधील एक आहे.

महत्वाच्या बातम्या-