बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टीम इंडियात नक्की चाललंय का?, सौरव गांगुलीचा दावा कोहलीने फेटाळला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आणि भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात वाद निर्माण माहिती समोर आली होती. मात्र, विराट कोहलीने पत्रकार परिषदेत रोहित सोबत कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे याच पत्रकार परिषदेत कोहलीने सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) वक्तव्यावर भाष्य केलं होतं. त्यावरून आता पुन्हा वाद उफाळताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने भारतीय टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्याला कर्णधारपद सोडू नको असं मी सांगिल्याचा दावा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केला होता. त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहलीने सौरव गांगुलीचा हा दावा फेटाळून लावला आहे.

माझ्या या निर्णयामुळे कोणालाही काहीही त्रास झाला नाही. तसेच मला कोणीही सांगितलं नाही की तू कर्णधारपद सोडू नको, असं विराट पत्रकार परिषदेत म्हणाला आहे. मी सर्वात आधी माझा हा निर्णय बीसीसीआयला कळवला होता. त्यावेळी माझ्या या निर्णयाचा विरोध न करता त्यांनी त्याचा स्विकार केला होता, असं विराट म्हणाला आहे.

दरम्यान, विराट कोहलीने रोहित शर्मा यांच्यासोबत असलेल्या कथित वादावर देखील भाष्य केलं. रोहित शर्मा सोबत माझा काहीही वाद नाही. उलट तो जखमी असल्याने आता आम्हाल दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर कमी जाणवेल, असंही कोहली म्हणाला आहे.

थोडक्यात बातम्या-

हरभजन सिंग काॅंग्रेसमध्ये जाणार का?; सिद्धूंच्या ट्विटची एकच चर्चा

Omicron नाही तर ‘या’ व्हेरियंटचा अधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

“जोपर्यंत ‘तो’ मंत्री जेलमध्ये जात नाही तोपर्यंत…”, राहुल गांधी आक्रमक

ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के! निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ मोठे संकेत

महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भात Omicronचा शिरकाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More