बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2 खेळातील 2 दिग्गजांची होणार भेट???; कोहली-रोनाल्डो मँचेस्टरमध्ये भेटण्याची शक्यता

मुंबई | भारतात क्रिकेट म्हणजे एक प्रकारे उत्सव समजला जातो. तर जगभरात फुटबाॅल खेळाडूंचे मोठे चाहते आहेत. त्यातच आता भारताचा स्टार खेळाडू आणि  कर्णधार विराट कोहली आणि सुप्रसिद्ध फुटबाॅलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विराट कोहली क्रिकेटमधील तर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू आहे. या दिग्गज खेळाडूंच्या भेटीची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. येत्या 10 सप्टेंबरला इंग्लंडविरूद्धचा पाचवा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये होणार आहे. त्यावेळी रोनाल्डो देखील मँचेस्टरमध्येच असणार आहे. त्यावेळी या दोन खेळाडूंची भेट होणार असल्याचं वृत्त एका संस्थेने दिलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विराट कोहली यांची भेट होणार असल्याचं समजतंय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट होईल की नाही, याबाबत शंका देखील उपस्थित केली जात आहे.

दरम्यान, हे दोन खेळाडू आपापल्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आहेत. दोघांचेही सोशल मीडियावर खूप मोठे फॉलोवर्स आहेत. नुकताच विराट कोहलीने इंन्स्टाग्रामवर 150 मिलीयन फॉलोवर्स पुर्ण झाले आहे.

थोडक्यात बातम्या-

“राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा”

1 नोव्हेंबर पासून ‘या’ स्मार्टफोन, अॅन्ड्रॉईडफोनमधून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार

कोरोनाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांचा यु टर्न; म्हणाल्या…

“मराठा आरक्षण बैठकीला सरकार तयार होत नसेल तर…’; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

“डिस्को आणि बार ही काय आरोग्य केंद्रे आहेत का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More