बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

T-20 World cup: पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला कोहली, म्हणाला…

नवी दिल्ली| काल दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर 10 विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानं मात्र भारताला मोठा धक्का बसला आहे. काल झालेल्या या रंगतदार सामन्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहे. सोशल मीडियावर सगळीकडे याचीच चर्चा दिसत आहे.

भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं पत्रकाराचीच शाळा घेतल्याचं दिसून आलं. या पत्रकार परिषेत एका पाकिस्तानी पत्रकारानं इशान किशान फाॅर्ममध्ये असताना त्याच्याऐवजी रोहित शर्माला टीममध्ये संधी दिली. टीमनं निवड करताना चूक केली का? असा प्रश्न विराटला केला. यावर विराटनं त्या पत्रकाराचीच शाळा घेतली.

या प्रश्नाचं उत्तर देताना विराटनं त्या पत्रकारालाच उलट प्रश्न केला. हा अत्यंत धाडसी प्रश्न असून तुम्हाला याविषयी काय वाटतं?. विराटनं पुढे म्हटलं की, जे बाहेरून प्रश्न विचारतात त्यांनी एकदा आमचं कीट घालून मैदानात उतरावं. तेव्हा त्यांनी समजेल की दबाव काय असतो.

दरम्यान, जर फक्त वाद निर्माण करायचा असेल तर आधी मला सांगा, मी देखील त्यानुसार उत्तर देईन. असंही विराटनं म्हटलं. त्यामुळे सध्या या मुलाखतीची चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

“एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये याला काय म्हणावं?”

पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर अशी होती पंतप्रधान इम्रान खान यांची प्रतिक्रीया

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; दिवाळीत सोनं मिळणार स्वस्तात!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदी आधीच केंद्राकडून अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More