करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी 26 किलोची सोन्याची पालखी

कोल्हापूर | करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी 26 किलो सोन्याची पालखी अर्पण करण्यात आली आहे. मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंदिराला आलेल्या देणगीतून ही पालखी तयार करण्यात आली आहे. 

पालखीसाठी 19 हजार भाविकांकडून 26 किलो सोनं देणगी स्वरुपात मिळालं होतं. देशातल्या 3 प्रमुख पीठांच्या शंकराचार्यांच्या हस्ते ही पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सोपवण्यात आली. यावेळी भक्तांनी देवीच्यादर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

पाहा व्हिडिओ – 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या