Maratha Aaamsabha 1 - कोल्हापुरात पहिली मराठा आमसभा संपन्न, दिग्गजांची हजेरी
- कोल्हापूर, महाराष्ट्र

कोल्हापुरात पहिली मराठा आमसभा संपन्न, दिग्गजांची हजेरी

कोल्हापूर | मराठा समाजाची पहिली आमसभा कोल्हापुरातील पडली. मराठा आरक्षणासोबत समाजातील इतर महत्त्वाच्या विषयांवर या आमसभेत चर्चा करण्यात आली.

मार्केट यार्ड परिसरातल्या श्री शाहू सांस्कृतिक भवनात या आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महसूलमंत्री चंदकांत पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे, समरजित घाडगे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी या आमसभेला उपस्थिती लावली. न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा