कोल्हापूरातील भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, कारने चौघांना उडवलं

Kolhapur accident | राज्यात पुणे अपघात प्रकरण ताजं असतानाच अजून एका अपघातामुळे खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात एका भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या अपघातात कारने चौघांना चिरडल्याची माहिती मिळाली आहे.

शहरातील सायबर चौकात हा भीषण अपघात घडला आहे. यात चालकासह 3 ठार झाले असून 5 जखमी झाले आहेत. तर 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचे व्हिडिओ बघून अंगावर थरकाप आल्याशिवाय राहणार नाही.

नेमका कसा घडला अपघात?

शहरातील सायबर चौकात दुपारी रस्त्यावर (Kolhapur accident)वाहनांची तशी वरदळच होती. काही लोक दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होते. अशात अचानकच मागून एक भरधाव वेगाने कार येते आणि समोर असलेल्या दोन-तीन दुचाकींना जोराची धडक देऊन पुढे जाते.

कारचा वेग इतका जास्त होता की, समोरच्या काही गाड्या लांब दूरवर फेकल्या गेल्या.जोराची धडक बसल्याने काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. एका दुचाकीवर तर महिला आणि लहानशी मुलगी देखील दिसून येत आहे.

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

सुदैवाने या अपघातमध्ये या चिमुकलीचा जीव वाचला आहे.अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र, या अपघातामध्ये तिघांना मृत घोषित करण्यात आलंय.

अपघात झाल्यानंतर रस्त्यावर बरीच (Kolhapur accident) गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांनी कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. व्हिडिओमध्ये सर्व सुरळीतपणे वाहन चालवत असल्याचं दिसतंय. मात्र, नंतर अचानकच प्रचंड वेगाने आलेल्या कारने दोन-तीन दुचाकीना वाऱ्यासारखं उडवत नेल्याचं दिसतंय. याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.

News Update – Kolhapur accident news 

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाला धक्का; ‘या’ स्टार क्रिकेटपटूने घेतली तडकाफडकी निवृत्ती

राज्यातील ‘या’ भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज, महत्त्वाची अपडेट समोर

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने उचललं मोठं पाऊल!

मुंबई हादरली! मंत्रालयासमोर IAS अधिकाऱ्याच्या लेकीने उडी मारुन संपवलं जीवन

“…तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल”; निकालापूर्वीच शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र