कोल्हापुरात खासगी बसला आग, 2 जणांचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर | खासगी बसला लागलेल्या आगीच दोघांचा होरपळून मृत्यू झालाय. गगनबावडा मार्गावरील लोंघे गावाच्या हद्दीत पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक दुर्घटना घडली. 

आत्माराम ट्रॅव्हल्सची ही बस गोव्यावरुन कोल्हापूर आणि पुणेमार्गे मुंबईला जात होती. एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागल्याचं कळतंय. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झालीय. 

आगीत ज्या दोघांचा मृत्यू झालाय ते पुण्याचे रहिवाशी होते. बंटी आणि विकी भट अशी या दोघांची नावं आहेत.