बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

कोल्हापूर | कोल्हापूरमधून (Kolhapur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (NCP MLA Chandrkant Jadhav) यांचे निधन झालं आहे. ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या अशा अचानक जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

चंद्रकांत जाधव हे काँग्रेसच्या तिकीटावर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यांनी कोल्हापूरमधून सलग दोन वेळा निवडून आलेल्या राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकातं जाधवांनी पराभव केला होता. याशिवाय चंद्राकातं जाधव यांच्या पत्नीदेखील राजकारणात सक्रिय असून त्या कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेविका आहेत.

चंद्रकातं जाधव यांची कोल्हापूरच्या राजकारणात शातं आणि प्रामाणिक नेता म्हणून ओळख होती. ते राजकारणाशिवाय बिजनेसमध्येही सक्रिय होते. चंद्राकातं जाधव यांची पत्नी भाजपकडून नगरसेविका आहेत. त्यामुळे चंद्रकातं जाधव यांचे अनेक भाजप नेत्यांसोबत चांगले संबध आहेत. भाजप नेते चंद्रकातं पाटील यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

दरम्यान, चंद्रकातं जाधव गेल्या अनेक दिवसांपासून हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, उपचारादम्यानच ह्रद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबाला धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव आज दुपारपर्यंत कोल्हापूरमध्ये आणले जाणार आहे. त्यांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

मी देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहे- कंगना रनौत

‘…त्यावेळी मात्र या सरकारला लकवा मारतो’; भाजप नेत्याची बोचरी टीका

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More