व्याजाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी, वारंवार बलात्कार शिवाय… कोल्हापूरात नक्की काय घडलं?

crime

Kolhapur crime | व्याजाने पैसे देऊन व्याजाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. महिलेला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आल्याचे समोर आले आहे. (Kolhapur crime)

व्याजाच्या बदल्यात जबरदस्तीचे संबंध

शाहूपुरी पोलिसांनी रामा विठ्ठल जानकर (वय-४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत २०१४ ते २०२४ या कालावधीत जानकरने तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे नमूद केले आहे.

फिर्यादीत असेही म्हटले आहे की, जानकरने सुरुवातीला तिला ७० हजार रुपये १० टक्के व्याजाने दिले होते. मात्र, व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावत त्याने महिलेची असहाय्यता पाहून तिच्यावर जबरदस्ती केली. दारू पाजून बेशुद्ध अवस्थेत तिचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ते नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत त्याने तिला अनेकदा अत्याचार सहन करण्यास भाग पाडले.

अवैध सावकारी आणि जबरदस्तीचा प्रकार

फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, जानकरने व्याजाच्या पैशांसाठी तिचे राहते घरही तीन लाख रुपयांत बळजबरीने नावावर करून घेतले. त्यानंतरही व्याजाच्या मोबदल्यात शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत राहिला. त्याच्या सततच्या धमक्या आणि जबरदस्तीमुळे पीडित महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.

जानकर हा कोणत्याही शासकीय दफ्तरी अधिकृत सावकार नसून तो अनधिकृतपणे व्याजाने पैसे देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव अधिक तपास करत आहेत. (Kolhapur crime)

 Title : Kolhapur crime Loan Shark Arrested for Sexual Assault

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .