कोल्हापूर | पावसाचा जोर कायम असल्याने कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक भागात पाणी साचलं असून पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत.
पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा वापर केला जात आहे. हजारो नागिरकांना आत्तापर्यंत सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
कोल्हापूर, सांगली परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी, नाले, धरणं तुडुंब भरली आहेत. यामुळे तेथील लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, मुख्यमंत्री जनता ठरवेल- अमोल कोल्हे
दीदी, तुम्ही दिलेला शब्द न पाळताच सोडून गेलात; स्मृती इराणींचं भावूक ट्विट
-“प्रत्येकाशी जुळवून घेण्याची सुषमा स्वराज यांची वृत्ती कायम लक्षात राहील”
-“तुम्ही मंगळावर अडकलात तरी भारतीय दुतवास तुमच्या मदतीसाठी धावून येईल”
-आई…अशी कशी निघून गेलीस!; सुषमा स्वराज यांचा ‘तो’ व्हीडिओ होतोय व्हायरल
Comments are closed.