कोल्हापूर महाराष्ट्र

कोल्हापुरच्या मतदारांनी ‘ध्यानात ठेवलं’; कोल्हापुर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीला

Loading...

कोल्हापुर |  कोल्हापुर लोकसभेची जागा आघाडीने मोठ्या फरकाने गमावली. मात्र महापालिका पोटनिवडणुकीच्या दोन्ही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या.

सिद्धार्थनगर आणि पद्मराज या दोन जागांवर निवडणूक झाली होती. सिद्धार्थनगरात काँग्रेसचे जयकुमार पटकारे तर पद्मराज प्रभागात राष्ट्रवादीचे अजित राऊत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारत विजय मिळवला.

Loading...

या दोन्हीही प्रभागातील नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांच्यावर पक्षांवर बंदीची कारवाई झाल्याने या जागांवर निवडणूक झाली होती.

दरम्यान, कोल्हापुर लोकसभेत ‘आमचं ठरलंय’ हा फॅक्टर चांगलाच गाजला होता. मात्र पोटनिवडणुकीत  जनतेने आघाडीला ध्यानात ठेवलं, असंच म्हणावं लागेल.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-जपानला चारी मुंड्या चित करत भारतीय हॉकी महिला संघाने जिंकली मालिका

-“गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा सोडणार नाही”

-सात महिन्यांमध्ये आरबीआयला ‘हा’ दुसरा मोठा धक्का

Loading...

-चोंबडेपणा करु नका; शिवसेनेनं डोनाल्ड ट्रम्पना खडसावलं!

-सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या; एसपींनी नराधमाला घातल्या गोळ्या

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या