चंद्रकांत पाटलांच्या घरावर ‘महाराष्ट्र एकीकरण’ची चढाई!

चंद्रकांत पाटलांच्या घरावर ‘महाराष्ट्र एकीकरण’ची चढाई!

कोल्हापूर | कर्नाटकचा गौरव केल्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जातोय. त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमध्ये चंद्रकांत पाटील यांनी कन्नड गीत गायले होते. त्यामुळे संतप्त झालेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगावमधील कार्यकर्ते कोल्हापुरात येऊन धडकले होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या घरावर काढलेला मोर्चा पोलिसांनी रस्त्यातच अडवला, त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. आंदोलकांनी त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. 

 

Google+ Linkedin