कोल्हापूर | राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणं नाहीयेत त्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार केले जाणार आहेत. त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांना निर्देश देण्यात आले असून लक्षणं नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या देखरेखीखाली उपचार होतील.
कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे. सध्याच्या घडीला दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत. यासाठी संबंधित रुग्णाच्या घरी स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था असणे गरजेचं आहे.
आता आगामी काळात हा निर्णय कितपत यशस्वी ठरतो, हे देखील पाहावं लागणार आहे. त्याशिवाय कोल्हापूरप्रमाणे राज्याच्या इतर भागातही अशा प्रकारची व्यवस्था राबवली जाणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
बुधवारी राज्यात कोरोनाचे सर्वाधिक 10,576 रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचारांसाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यानंतर तज्ज्ञांना मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे देण्याबाबतही सांगण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“भाजपचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी, केवळ निवडणुकीपुरते शिवाजी महाराज हवेत”
अस्मिता महत्त्वाची की लाचारी ते ठरवा- संदीप देशपांडे
राजगृह तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी केली दुसरी मोठी कारवाई
कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच कोकिलाबेन रूग्णालयात ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया
खासगी लॅबचा अहवाल पाॅझिटिव्ह तर सरकारी अहवाल निगेटिव्ह; पुण्यातील धक्कादायक प्रकार