24 डिसेंबरपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ

मुंबई | येत्या 24 डिसेंबरपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. उडाण योजनेअंतर्गत ही विमानसेवा सुरु होणार आहे. 

दर मंगळवार, बुधवार आणि रविवारला ही सेवा असेल. यासाठी एअर डेक्कनचे विमान दिल्लीत दाखल झाले असून उद्यापासून तिकीट बुकिंग सुरू होणार आहे.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांना माहिती दिलीय.