स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही खपवू नका; नानांनी भन्साळींना सुनावलं

कोल्हापूर | कलाकार म्हणून मला माझे मत मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र ऐतिहासिक कथा सिनेमांमधून मांडताना स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही खपवू नका, असं परखड मत अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडले. ते कोल्हापुरात बोलत होते. 

‘पद्मावत’ सिनेमाच्या मुद्द्यावरुन सध्या देशात चांगलाच गदारोळ सुरु आहे. त्यावरुन नानांनी सेन्सॉर बोर्डावरही टीका केली. सेन्सॉर बोर्डामध्ये अभ्यासू आणि त्या विषयाच्या सखोल परिणामांचा अभ्यास करणारी माणसं असली पाहिजे असं ते म्हणाले. 

दरम्यान, मी आजपर्यंत संवेदनशील विषयांवर तब्बल 50 सिनेमे केेले, मात्र त्यापैकी एकही सिनेमा वादात सापडला नाही, असंही नाना पाटेकर म्हणाले.