पाचशे रुपयात दहावीत दहा गुण?; बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट!

SSC Paper Leak

Kolhapur News | दहावीच्या परीक्षेला (SSC Exam) बसणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पाचशे ते हजार रुपयांत क्रीडा आणि कला क्षेत्रातील बोगस प्रमाणपत्रे (Bogus Certificates) विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे दहावीच्या निकालात गुणवाढ करून घेण्याचा हा गोरखधंदा उघड झाला असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. (Kolhapur News)

काय आहे प्रकार?

दहावीच्या विद्यार्थ्यांना (SSC Students) विविध लोककला, इतर कला गुण, चित्रकला व इतर काही उल्लेखनीय कामगिरीबाबत दहा अतिरिक्त गुण सवलतीचे दिले जातात. यासाठी शाळांकडून (Schools) रीतसर प्रस्ताव मागवले जातात. हे प्रस्ताव संबंधित संस्थांच्या प्रमाणपत्रांसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठवावे लागतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यामध्ये बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला होता.

यंदा राज्यातील ५२ मान्यताप्राप्त संस्थांना असे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार शिक्षण विभागाने दिले आहेत. यातील काही संस्थांनी थेट पालकांशी संपर्क साधून पैसे घेऊन अशा प्रमाणपत्रांची विक्री केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांना लोककला प्रकाराची कोणतीही माहिती नसतानाही त्यांना या प्रकारात ही प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. (Kolhapur News)

शिक्षकांकडून संताप व्यक्त

या प्रकाराबद्दल बोलताना शिक्षक अशोक मानकर (Ashok Mankar) म्हणाले, “बोगस सर्टिफिकेटमुळे (Bogus Certificate) खऱ्या हुशार मुलांवर अन्याय होणार आहे. यामुळे शाळा आणि पालकांनीही अशा दुकानदारीला थारा देऊ नये.” तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी, “बोगस सर्टिफिकेट (Bogus Certificate) संदर्भात तातडीने छाननी करण्यात येणार असून, त्यामध्ये चुकीचे आढळल्यास हे प्रस्ताव रद्द करण्यात येतील,” असे सांगितले आहे.

या प्रकारामुळे प्रामाणिकपणे कला आणि क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Kolhapur News)

Title : Kolhapur News SSC Students Getting Extra Marks by Paying 500 Rupees 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .