पुलाचा कठडा तोडून मिनीबस पंचगंगेत कोसळली, 11 जण ठार

कोल्हापूर | शिवाजी पुलाचा कठडा तोडून मिनीबस पंचगंगा नदीत कोसळली. या धक्कादायक दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी आहेत. 

मृतांमध्ये पुण्यातील बालेवाडी आणि पिरंगुटमधील लोकांचा समावेश आहे. 26 जानेवारी आणि शनिवार-रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे हे लोक कोकण पर्यटनासाठी निघाले होते. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 4 वाजेपर्यंत बचावकार्य सुरु होतं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः याठिकाणी जाऊन पाहणी केली.