बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनाकारण बाहेर फिराल तर वाहन जप्त होणार, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कारवाई सुरु

कोल्हापूर | कोल्हापूर पोलीस आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. कोल्हापूरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. अनेक वेळा सांगितल्यानंतर देखील कोल्हापूरकर बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे आता संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई जिल्हा पोलीस दलाकडून सुरू झाली आहे. आता कोल्हापूर पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांची सरळ वाहने जप्त करताना दिसत आहेत.

कोल्हापूरात मंगळवारी दिवसभरात 146 वाहने जप्त करून नियमांचा भंग करणाऱ्या लोकांकडून चार लाखांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. संचारबंदीच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांंपासून पोलिस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्त करत आहेत. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी नाकाबंदीसह गस्तीपथकाद्वारे कारवाई सुरू केली आहे.

शुक्रवारी दिवसभरात शहरातील जुना वाशीनाका, दसरा चौक, बिंदू चौक, फोर्ड कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर अशा शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. विना मास्क फिरणाऱ्यांवर महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येत आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांकडून तब्बल 4 लाख 19 हजार 400 रूपयांचा दंडही वसूल केला गेला आहे.

दरम्यान, कोल्हापूरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्यामुळे आरोग्य व्यवस्था व्हेटींलेटरवर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे पोलीस आपलं काम उत्तमरित्या बजावताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

सावधान! महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका पुन्हा वाढला; जाणुन घ्या धक्कादायक आकडेवारी

“महाराष्ट्रात असेच कठोर निर्बंध कायम ठेवावे लागतील”; टास्क फोर्सचं मोठं वक्तव्य

ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा IPL सोडण्याचा निर्णय, मात्र ॲास्ट्रेलियन पंतप्रधांनांनी त्यांना दिला मोठा झटका

मुंब्य्रातील प्राईम हॉस्पिटलला मध्यरात्री भीषण आग; 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More