पुणे महाराष्ट्र

पूरग्रस्त गरजू शेतकऱ्यांना दुभती जनावरं देण्याची योजना; तुम्ही अशी करू शकता मदत

पुणे |  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुरात आपली दुभती जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांना शाश्वत स्वरूपात मदत करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची गरज ओळखून एक दुभती गाय किंवा एक दुभती म्हैस शेतकऱ्याला देऊन त्याला मदत करावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

गरजू शेतकऱ्याला गाय किंवा म्हैस असे दुभते जनावर देण्यासाठी मदत करायची इच्छा असल्यास सामाजिक कार्यकर्ते रविंद्र घाटे यांच्या 9822522333 या क्रमांकावर संदेश पाठवून आपले नाव आणि मदतीच्या रकमेची माहिती कळवावी.

ज्येष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना शाश्वत आणि दिर्घकालीन मदत व्हावी, म्हणून ही योजना आम्ही राबवत आहोत, असं रविंद्र घाटे यांनी सांगितलं.

दरम्यान, गणेशोत्सव मंडळांना एक गाय किंवा एक म्हैस खरेदी करून शेतकऱ्याला देणे शक्य असल्यास त्यांनी देखील या मदतीसाठी पुढे यावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आपल्याला कोणाची साथ नाही; मुर्खांच्या स्वर्गात राहू नका!”

-शिवसेना आमदाराचं स्तुत्य पाऊल; पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक

-विंग कमांडर अभिनंदन यांचा स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ने गौरव होणार!

-काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; मांडणार पूरग्रस्तांच्या व्यथा

-राज ठाकरेंच्या ‘होम मिनिस्टर’ पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या