भाजप सरकार नवसाचं पोर, पेकटात लाथा मारतंय पण सांगायचं कुणाला?

कोल्हापूर | आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांनी नवस करुन भाजप सरकार मागून घेतले. म्हणजेच भाजप सरकार नवसाचं पोर आहे. मात्र हे पोर मोठं होऊ आपल्याच पेकटात लाथा मारत असेल तर सांगायचं कुणाला?, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योजक रस्त्यावर उतरणार असतील, तर आपण त्यांचं नेतृत्व करायला तयार आहोत, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, सरकारविरोधात बोलल्याने शिवसेनेवर टीका होते. मात्र चुकीच्या गोष्टीवर आम्ही गप्प बसणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या