Vidhansabha l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. अशातच आज कोल्हापुरात लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेतेमंडळी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यर्तच महायुती सरकारला मोठा हादरा बसला आहे. कारण भाजप पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
महायुतीला मोठा झटका :
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देखील कोल्हापूरमध्ये जोरदार झटका बसला आहे. अशातच आता भाजप पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी पदाचा राजीनामा आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार ए. वाय. पाटील यांनी देखील आपल्या पदांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे सुद्धा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. मात्र पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महायुती सरकार मधील दोन पक्षांना एकाच वेळी जोरदार झटका बसल्याने महायुतीसमोरील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचे आव्हाने वाढली आहेत.
Vidhansabha l विधानसभेचं तिकीट कोणाला मिळणार? :
गेल्या काही दिवसांपासून ए वाय पाटील हे अजित पवार गटांमध्ये नाराज असल्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. मात्र त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वारंवार सुरू होता. मात्र त्यामध्ये अजित पवार गटाला अपयश मिळालं आहे.
ए वाय पाटील यांनी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलं आहे. मात्र ए वाय पाटील यांचे मेहुणे बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के माजी आमदार के पी पाटील सुद्धा याच मतदारसंघातून इच्छुक असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
News Title : Kolhapur Vidhansabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्यानेच..”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीचा मोठा प्लॅन; आदित्य ठाकरेंविरोधात हा बडा नेता निवडणूक लढवणार?
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आता कधी होणार?
शरद पवारांना कोण मारणार? भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक टोला
अंगावर येईल काटा! पुणे-नगर महामार्गावरील अपघातात एक जण ठार