Top News

कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास NIAकडे द्यायला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, राष्ट्रवादी मात्र नाराज!

मुंबई | कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचा तपास पुणे पोलिसांकडून काढून राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. मात्र सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबतचा तपास एनआयकडे देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राज्य सरकारकडून काढून घेणं अयोग्य आहेच. त्यापेक्षा त्याला मान्यता देणं जास्त अयोग्य आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नसल्याचं स्पष्ट दिसून येतंय. कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असतानाही मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला मंजूरी दिल्याने राष्ट्रवादीतली नाराजी समोर आली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी निर्णय घेणं मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे पण याबाबत राज्याच्या गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे. याबाबत अनेकांनी आमच्याकडे तक्रारी केल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर शरद पवारांनी पडदा टाकल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग बातम्या-

मी पहिल्यांदा भारतीय नागरीक नंतर गायक- अदनान सामी

सोनिया गांधींना लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर अशोक चव्हाण म्हणतात…

महत्वाच्या बातम्या-

केंद्र सरकारमुळेच देशात बेरोजगारी आणि महागाई- सुप्रिया सुळे

चिमुरडी कोल्हेंना म्हणाली, ‘बाहेर जाऊ नका ते तुम्हाला पकडतील’…

“सुट्ट्यांच्या बाबतीत समान नागरी कायदा असावा असं कुणाला का वाटू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या