कोल्हापूर महाराष्ट्र

पोरगी पळून गेली; बापानं चौकाचौकात श्रद्धांजलीचे पोस्टर लावले

कोल्हापूर | आपल्या मर्जीच्या साथीदाराला आयुष्यभराची साथ देण्यासाठी घरातून पळून जाऊन लग्न केलं. मुलीच्या वडिलांनी तिचे श्रद्धांजलीचे पोस्टर लावून तिला मृत घोषित केल्याचा प्रकार कागल तालुक्यातील व्हन्नूर गावात घडला आहे.

आपली पोटची मुलगी प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेली की याची जाहीर वाच्यता होऊ नये असाच बहुतेकांचा प्रयत्न असतो. मात्र व्हन्नूरमधील पित्याने चक्क आपल्या मुलीचे श्रद्धांजलीचे पोस्टर लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बाळ तू जन्माला येतानाच संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस. त्या वेदना सहन करीत ज्या आईनं तुझे सर्व हट्ट, लाड पुरवित तुला मोठं केलं. ती दुर्दैवी आई… आजपर्यंत तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा… परंतु पुढच्या आयुष्यात आनंद, सुख देण्यास असमर्थ ठरलेला… ज्याला तू सोडून गेलीस… हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा हा कमनशिबी बाप…” दोघेही शोकाकुल आहेत, असा मजकुर पोस्टरवर छापण्यात आला आहे.

दरम्यान, हा पोस्टर पाहून असं वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊन त्या आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा, असंही पोस्टरवर लिहिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चिमुरडी कोल्हेंना म्हणाली, ‘बाहेर जाऊ नका ते तुम्हाला पकडतील’…

मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची घरं मिळणार- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

चिमुरडी कोल्हेंना म्हणाली, ‘बाहेर जाऊ नका ते तुम्हाला पकडतील’…

“सुट्ट्यांच्या बाबतीत समान नागरी कायदा असावा असं कुणाला का वाटू नये”

मी पहिल्यांदा भारतीय नागरीक नंतर गायक- अदनान सामी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या