बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोल्हापूरकरांनो, निर्बंध लादण्याची आम्हाला हौस नाही, थोडं सोसा”

कोल्हापूर | महाराष्ट्र राज्यातील काही भागात कोरोना रूग्णाची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने त्या भागातील निर्बंध शिथिल केले आहेत. तर याउलट काही भागात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही वाढत असल्यामुळे त्या ठिकाणचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश असल्याचं समजत आहे.

या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यातील सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही. आम्हाला निर्बंध लादण्याची हौस नाही, थोडं सोसा, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

तसेच, बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क ऐवजी रूमाल असतो आणि तोही तोंडावर नसून खाली असतो. पोलीस आले की तो रुमाल वर करतात. असं करु नका. तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे निर्बंध कडक करण्याची अंमलबजावणी व्हायला हवी.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्याचप्रमाणे रूग्णसंख्या वाढली तरी खासगी हॉस्पिटलने चूकीची बिलं लावू नये. तसेच येत्या 5 जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू होईल. त्यात काही पुरवणी मागण्या मंजूर केल्या जातील, असंही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

इंग्लंडच्या युवा खेळाडूची वादळी खेळी; केवळ 65 चेंडूत केल्या 136 धावा

हनीमूनला जाताच पत्नीसमोर आलं पतीचं सत्य, त्यानंतर पत्नीनं केलं असं काही की,…

राज्यातील शाळा सुरू होणार?; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More