कोल्हापूरचा गडी सगळ्यावर भारी! पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी
सातारा | रांगड्या मातीचा खेळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुस्तीची (Wrestling) लोकप्रियता आता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. मानाची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा यावर्षी कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं (Pruthviraj Patil) जिंकली आहे. सर्वस्तरातून पाटीलचं कौतूक होत आहे.
साताऱ्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटीलनं नवी मुंबईच्या विशाल बनकरला पराभूत केलं आहे. विशाल बनकरनं शेवटपर्यंत कमालीची झुंज दिली. पृथ्वीराज पाटीलनं अंतिम सामना 5-4 असा जिंकला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणेचा रहिवासी असलेला पृथ्वीराज महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे.
कोल्हापूरात शाहू कुस्ता केंद्रात सुरूवातीच्या काळात कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं आहे. सध्या बेळगावमध्ये मराठा लाइट इन्फंट्रीत हवालदार पदावर कार्यरत आहे. 2020-2021 या काळात पृथ्वीराजनं तीन कुस्ती स्पर्धांमध्ये पदकं पटकावली आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अनेक मल्लांनी या स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपलं आणि राज्याचं नाव गाजवलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या म्हणून…”
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी
“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागं संजय राऊतांचा हात”
“एवढं काम करतोय की काम करून करून…”; अजित पवारांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
“पवार कुटुंबानं महाराष्ट्राला विकत घेतलं आहे का?”; निलेश राणेंचा खोचक सवाल
Comments are closed.