बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रो-कबड्डीमधील सिद्धार्थ देसाई झाला मालामाल, लागली इतक्या कोटींची बोली!

मुंबई | भारतात आयपीएलनंतर प्रो-कबड्डी लीगला लोकांची पसंती सर्वात जास्त दिली जात आहे. प्रो-कबड्डी लीगचा पूढच्या हंगामासाठीचा लिलाव चालू झाला आहे. अशातच महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईवर सध्या पैशाचा पाऊस पडताना दिसत आहे. तेलुगू टायटन्सने सिद्धार्थवर तब्बल 1 कोटी 30 लाख रूपयांची बोली लावून त्याला रिटेन केलं आहे.

तेलुगू टायटन्सला सिद्धार्थला रिटेन करण्यासाठी एफबीएम कार्डचा वापर केला आहे. 2019 च्या हंगामात तेलुगू टायटन्सने त्याला 1.45 कोटी रूपयांना संघात घेतलं होतं. तर 2018 च्या मोसमात सिद्धार्थला यु-मुंबाने केवळ 36.4 लाख रूपयाची बोली लावली होती. परंतु या हंगामात सिद्धार्थवर धमाकेदार बोली लागली आहे.

सिद्धार्थ देसाई हा कोल्हापूरच्या चंदगड येथील राहणारा आहे. प्रो-कबड्डी लीग सुरू होण्याच्या अगोदरपासुन मी संपूर्ण लक्ष हा खेळावरच दिला होता. सुरूवातीपासून मी कबड्डी खेळत आलो आहे. परंतु व्यावसायिक पद्धतीने खेळलो नव्हतो. या अगोदर मी मातीच्या कोर्टात स्थानिक स्पर्धा खेळल्या आहेत, असं देसाई यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिक्षण संपल्यानंतर सिद्धार्थने स्थानिक स्पर्धा खेळायला सुरूवात केली. 2018 साली सिद्धार्थची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली होती. त्यावेळी त्याने सीनिअर नॅशनल ट्राफीचा किताब ही पटकावला होता. मागील वर्षाप्रमाणे सिद्धार्थ तेलुगू टायटन्स या संघाकडून प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा- गिरीश महाजन

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“ताई…मुलींबद्दल सहानुभूती बाळगावी, चूक मान्य केल्यानं कोणी लहान होत नाही”

बाबो! विमानतळावर जिन्सला पिवळा रंग लावून, तपासणी केल्यानंतर दिसलं ते पाहून पोलिसही झाले हैराण!

ऑलिम्पिकनंतर पॅरालिम्पिकमध्येही भारताला भालाफेकमध्ये सुवर्ण, सुमित अंतिलने रचला इतिहास!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More