बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल- अय्यरने मुंबईला धो धो धुतलं! कोलकाताचा मुंबईवर धमाकेदार विजय

मुंबई | आयपीएलचा थरार मे नंतर पुन्हा एकदा मैदानावर चालू झाला आहे. आज मुंबई इंन्डियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्या सामन्यामध्ये मुंबईच्या क्विंटन डिकॉकने 55 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना कोलकत्ता नाईट रायडर्सला 156 धावांचा लक्ष्य दिलं. मात्र कोलकाताच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार फंलदाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईवर विजय मिळवला आहे.

कोलकत्ता नाईट रायडर्सच्या राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदांजांना घामटा काढला. त्रिपाठीने 39 चेंडूत 71 धावांची विजयी खेळी केली. त्या आधी व्यकंटेश अय्यरने 3 गगनचुंबी षटकार ठोकत आणि 4 खणखणीत चौकार लगावत 53 धावांची खेळी साकारली आहे. कोलकाताच्या फलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना पळता भुई करून सोडलं होतं.

मुंबई इंन्डियन्सचा कर्णधार रोहित शर्मांनी या सामन्यात 33 धावांची खेळी केली होती. त्याच्यापाठोपाठ कायरन पोलार्डने 15 चेंडूत 21 धावांची खेळी केल्यामुळे मुंबई संघाला 156 धावांपर्यंत मजल मारता आली. परंतु मुंबईच्या या खेळीवर कालकाताच्या त्रिपाठी- अय्यर जोडीने पाणी फेरलं आणि कालकाताने 7 गडी राखून हा सामना आपल्या खिशात घातला.

दरम्यान,  कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाने हा सामना जिंकून आयपीएलच्या गुणतालिकेत 4 थ्या क्रमांकावर आहे. तर या सामन्यानंतर मुंबई इंन्डियन्स संघ सातव्या क्रमांकावर आहे.

थोडक्यात बातम्या- 

”भाजपला 3 वर्षात देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”

राष्ट्रवादीच्या महेबुब शेख यांना मोठा झटका, बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

“महिला सुरक्षेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहातील”

धक्कादायक! कल्याणमध्ये शिक्षकाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

काढणीस आलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतापले; सोशल मीडियावर पसरतोय #सोयाबीन ट्रेंड!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More