बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोलकाता आता आहे तय्यार! कोलकाताचा पंजाबवर 5 विकेट्सने विजय

गांधीनगर | कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात कोलकाताने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवल आहे. गालंदाजांनी केलेल्या चकमदार कामगिरीमुळे आणि त्यानंतर कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने विजय मिळवला आहे. मॉर्गनने नाबाद 47 धावांची खेळी केली.

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवरील यंदाच्या मोसमातील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवला गेला. मॉर्गनने प्रथम गोलंदीचा घेतलेला निर्णय घेतलेला सार्थ ठरवत कोलकाताच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा केला. यामध्ये प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यासोबतच कमिन्स, सुनिल नरेन यांनी 2 तर शिमव मावी आणि वरूण चक्रवर्ती यांनी 1 गडी बाद करत पंजाबला 20 षटकात 9 बाद 123 धावा करता आल्या.

फलंदाजीला आलेल्या कोलकाताचीही सुरूवात निराशाजनक झाली. राणा आणि गिल झटपट बादझ झाले. त्यापाठोपाठ नरेनही बाद झाला. नरेनचा उंच उडालेला झेल पंजाबच्या रवि बिश्नोईने सुरेखरित्या टिपला. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार असं वाटत असताना मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने भागीदारी रचली. त्यानंतर राहुल बाद झाला आणि लगेच रसेलही धावबाद झाला.

दरम्यान, पंजाबने वातावरण केलं असं वाटत असताना दिनेश कार्तिक आणि मॉर्गनने आक्रमक फटकेबाजी करत 17 व्या षटकात सामना जिंकला. पंजाबने कोलकाताचे 5 गडी बाद केले त्यामध्ये पंजाबकडून मोहम्मद शमी, हेनरिक्स, दिपक हुड्डा आणि अर्शदिर सिंह यांनी 1 गडी बाद केला.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाबाधित आईच्या बाळावर मैत्रीच्या प्रेमाची सावली, नवजात बालकाला 11 दिवस दिली आईची माया

जात पात विसरत मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

केवळ दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

मुंबई-पुण्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात धावणाऱ्या ‘या’ रेल्वेगाड्या 10 मे पर्यंत रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More