बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या अडचणी वाढल्या! कोलकाताने राजस्थानला केलं चारी मुंड्या चीत

मुंबई |  राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने 6 गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये कोलकाताचा गोलंदाज शिवम मावीने सर्वाधिक 4 गडी बाद करत राजस्थानला बॅकफूटवर टाकलं.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाची सुरूवात दमदार झाली. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतकी भागिदारी केली. यामध्ये शुभगन गिलेन अर्धशतक केलं त्यानंतर कोलकाताकडून कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र कोलकाताने राजस्थानला 172 धावांचं लक्ष्य केलं आहे.

राजस्थानने फलंदाजीला आल्यावर कोलकाताच्या गोलंदाजांनी रॉयल्सचा सलामीवीर जयस्वालला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. राजस्थानानचे तीन फलंदाज शून्यावर परतले तर 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

दरम्यान, राजस्थानच्या पराभवामुळे मुंबई इंडिअन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. आज दुपारी झालेल्या सामन्यामध्ये पंजाबनेही चेन्नईवर विजय मिळवला आहे.  त्यामुळे आता चौथ्या क्रमांकासाठी आता चुरस निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पुढील 3 महिने अधिक महत्त्वाचे’; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा गंभीर इशारा

मागील सरकारच्या काळात फडणवीसांनी गाजर वाटपाचा कार्यक्रम केला- आदित्य ठाकरे

कौतुकास्पद! फळविक्रेत्याच्या मुलाने टाकला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

चोरट्यांच्या टीमने भररस्त्यात कार चालकाला लुटलं; घटनेचा व्हिडीओ CCTVमध्ये कैद!

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More