अमित शहांना कोलकाता हायकोर्टाचा दणका!

कोलकाता | भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पश्चिम बंगालमध्ये रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालायनं परवानगी नाकरली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने लोकशाही बचाव यात्रा या नावानं रथयात्रा काढण्याचं जाहीर केलं होतं. रथयात्रेला परवानगी मिळावी म्हणून भाजप उच्च न्यायालयात गेलं होतं.

रथयात्रेची सुरवात 7 डिसेेंबरला होणार होती. 42 लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या रथयात्रेला अमित शहा हिरवा झेंडा दाखवणार होते.

दरम्यान, 40 दिवस चालणाऱ्या रथयात्रेमुळं पश्चिम बंगाल मध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असं म्हणत राज्य सरकारनं रथयात्रेला विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही- धनंजय मुंडे

-भाजप सरकार संविधानविरोधी आहे- शरद पवार

-राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!

-‘जीवनातून बाहेर पडण्यासाठी इथं कापा’ असं लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या