बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोलकताने फोडला विजयाचा नारळ; राहुल-राणाच्या खेळीपुढे पांडे-बेयरस्टोची खेळी व्यर्थ

चेन्नई | आयपीएलच्या 3ऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी हरवून या आयपीएल हंगामातील पहिला विजय मिळवला. चेन्नईच्या चपाॅकवर हा सामना खेळला गेला. कोलकाताने ठेवलेल्या 188 धावांचं आव्हान मनीष पांडे आणि जॉनी बयरस्टोच्या आक्रमक खेळीनंतर देखील हैदराबादला पूर्ण करता आलं नाही.

टॉस जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकताची सुरवात चांगली झाली. सलामीच्या नितीश राणानं आक्रमकपणे फटकेबाजी चालू केली. शुभमन गिल बाद झाल्यावर खेळायला आलेल्या राहुल त्रिपाठीने राणाला मोलाची साथ दिली आणि दोघांनी जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली. नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने 29 चेंडूत 53 धावांची खेळी केली आणि हैदराबाद समोर 188 धावांचं टार्गेट ठेवलं.

हैदराबादची सुरवात खराब झाली. दोन्ही सलामीचे फलंदाज स्वस्तात परतले. मनीष पांडे आणि जॉनी बेयरस्टोनं संघाला सावरलं. दोघांनी पहिल्यांदा सावधपणे तर नंतर पॉवर हिटिंग चालू केली. जॉनी बेयरस्टोनं 40 चेंडूत 55 धावा केल्या. तर मनीष पांडेने शेवटपर्यंत चिवट झुंज दिली. मनीष पांडेने 44 चेंडूत 61 धावा केल्या. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी 22 धावांची गरज होती. परंतु हैदराबादला फक्त 11 धावा करता आल्या आणि कोलकाताने सामना 10 धावांनी जिंकला.

दरम्यान, या सामन्यात युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. नितीश राणा, शुभमन गिल,  राहुल त्रिपाठी, मनीष पांडे, प्रसिध्द कृष्णा आणि अब्दुल समद यांनी या सामन्यात चमक दाखवली. कोलकाता नाईट रायडर्सने या मॅचसह विजयी सलामी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

इंदोरीकर महाराजांचा थोडा वेळ गेला, मात्र ‘या’ मंडळींना चांगला झटका दिला!

सेक्सनंतर प्रेयसीने केली विचित्र मागणी, वैतागलेल्या प्रियकराने थेट तज्ञांकडे मागितली मदत

लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती हाती, ‘या’ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊन?

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

शरद पवारांच्या सातारच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More