बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

नवी दिल्ली | राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात आज चुरस रंगताना पहायला मिळणार आहे. आयपीएलचा 54 वा सामना शारजाह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जर हा सामना कोलकाता नाईट रायडर्स जिकंला तर कोलकाताला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे राजस्थान आपलं वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचं भवितव्य आता राजस्थानच्या हातात असणार आहे.

सध्या कोलकाताने 13 सामन्यात 12 गुण मिळविले असून कोलकाताने 0.294 रनरेट राखला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोलकाताने विजय मिळविला तर कोलकाताचे गुण 14 होणार आहेत आणि संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. मात्र कोलकातासाठी सर्वात मोठी अडचण ठरणार आहे ती म्हणजे कॅप्टन इयान मॉर्गनची खराब फाॅर्म. आयपीएलमध्ये इयान मॉर्गनला फारसी समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे कोलकातासाठी हा सामना जिंकणे आव्हान ठरणार आहे.

याउलट कोलकाताचे सलामीवीर व्येंकटेश अय्यर आणि शुभमन गिल या खेळांडूकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या दोघांची खेळी सामन्याच्या निर्णयात  फरक पाडणार आहे. शिवाय मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद सनरायजर्स या दोन संघातील सामनादेखील कोलकाताचे भविष्य ठरविणार आहे. कारण मुंबई इंडियन्सने जर हैदराबादचा पराभव केला आणि मुंबईचा रनरेट जर कोलकातापेक्षा कमी राहीला तर कोलकाता प्लेऑफमध्ये जाणार आहे.

सध्या दिल्ली कॅपिटल्सन ही गुणांच्या बाबतीत आघाडीवर असून दिल्लीने 13 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या क्रमाकांवर चेन्नई सुपर किंग्ज आहे. चेन्नईने आतापर्यंत 9 सामने जिंकून 18 गुण मिळवले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. चौथ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 6 सामने जिंकले असून 12 गुण मिळवले आहेत. मुंबई इंडीयन्सनेही 12 गुण मिळविले आहेत. त्यामुळे मुंबई आणि कोलकाता यांच्यात प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघर्ष रंगणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आरोग्यमंत्र्यांनी केली नवीन योजनेची घोषणा, काय आहे ‘मिशन कवच कुंडल’?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More