बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरबो लोरबो जितबो रे! रोमांचक विजयासह कोलकाताची फायनलमध्ये एन्ट्री

मुंबई | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात क्वालिफायर-2 सामना खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाताने आक्रमक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र, अखेरच्या काही षटकात दिल्लीने पुनरागमन करत सामना अखेरच्या षटकापर्यंत आणला. मात्र, अखेरच्या षटकात कोलकाताच्या राहुल त्रिपाठीने षटकार खेचत दिल्लीचं स्वप्न धुळीस मिळवलं.

प्रथम नाणेफेक जिंकत कोलकाताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शाॅ लवकर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि मार्कस स्टाॅनिसने दिल्लीची फलंदाजी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टाॅनिस बाद झाल्यानंतर देखील दिल्लीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात श्रेयस अय्यरने धावा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 20 षटकात दिल्लीला केवळ 135 धावा करता आल्या.

दिल्लीने दिलेल्या 135 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांनी धमाकेदार खेळी साकारली. कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने 3 गगनचुंबी षटकार आणि 4 खणखणीत चौकार लगावत 55 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर शुभमन गिलने 46 चेंडूत 46 धावांची खेळी केली आहे. अय्यर बाद झाल्यानंतर नितिश राणांनी आपल्या संघाला विजयाचा समिप पोहचवलं. अखेरच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 7 धावांची गरज होती. या षटकात 2 गडी बाद झाले. आणि अखेर 2 चेंडूत 6 धावांची गरज असताना राहुल त्रिपाठीने गगनचुंबी षटकार खेचत कोलकाताला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.

दरम्यान, कमी धावांचं आव्हान असताना देखील कोलकाताने आक्रमक खेळी करत दिल्लीचा गेम फिरवला. या विजयामुळे त्यामुळे आता कोलकाताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. येत्या 15 ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंगसोबत कोलकाताचा मुकाबला रंगणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मला वाटत नाही गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत’; रणजित सावरकरांचं मोठं वक्तव्य

‘मी एकट्याने पाप केलं असेल तर…’; माफी मागत राष्ट्रवादीचे आमदार ढसाढसा रडले

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

शिवसेना देशातील दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष; ‘या’ माध्यमातून मिळाले कोट्यावधी रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More