’30 वर्षांमध्ये असं…’; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून सरन्यायाधीश संतापले

Kolkata Rape Case | कोलकाता बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. आता या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. व्हा. चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात सुनावणीदरम्यान अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना एका वकिलाने 150 ग्रॅम सीमेनचा उल्लेख केला असता सरन्यायाधीश भडकले. सरन्यायाधीशांनी सोशल मीडियावर जे काही सुरु आहे ते इथे वाचून दाखवण्याची गरज नाही, असं म्हटलं.

सरन्यायाधीश संतापले

पीडितेच्या शवविच्छेदनाचा अहवाल आमच्याकडे आहे, असं सरन्यायाधीशांनी वकिलाला सांगितलं. संतापलेल्या स्वरातच सरन्यायाधीशांनी, 150 ग्रॅमचा अर्थ काय होतो, हे आम्हाला ठाऊक आहे, असंही ते सुनावणीदरम्यान म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयामधील आजच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

सरन्यायाधीशांचे आंदोलक डॉक्टरांना निर्देश

एका क्षणी तर सरन्यायाधीशांना हसू नका असं सांगावं लागलं. इथे एका मुलीने सर्वात अमानुष पद्धतीने प्राण गमावले आहेत, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी बोलताना त्यांनी आंदोलक डॉक्टरांना निर्देश देखील दिलेत.

सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील तरुण महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. कामावर परतल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा शब्द कोर्टाने या आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका!; अदिती तटकरेंचे बँकांना महत्त्वाचे आदेश

पावसाळ्यात ‘या’ भाज्या खा; संसर्गाचा धोका होईल कमी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा झटका!

“बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्यानेच..”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचा मोठा प्लॅन; आदित्य ठाकरेंविरोधात हा बडा नेता निवडणूक लढवणार?