बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईला चारी मुंड्या चीत केलं तरी कोलकाताच्या कर्णधाराला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

मुंबई | गुरूवारी झालेल्या मुंबई इंडिअन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताने विजय मिळवला होता. एकवेळ मुंबईचं पारडं जड वाटत होतं मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या निर्णायक माऱ्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर कोलकाताच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे सामना एकहाती जिंकला.

बलाढ्य मुंबईचा पराभव केला तरी कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनला दंड बसला आहे. कारण मॉर्गनला बारिक सारिक नाही तर 24 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईवर कोलकाताने 7 गडी आणि 29 चेंडू राखत मोठा विजय मिळवला आहे.

मॉर्गनलाच नाही तर कोलकाताच्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी किमान 6 लाख रुपयांचा फटका बसला आहे. कोलकाताच्या संघाना एकदा नाही तर दोनवेळा संथ गतीने षटक टाकल्यामुळे त्यांना दुप्पट पटीने दंड ठोठावण्यात आला.

दरम्यान, मुंबई इंडिअन्सने 156 धावांचं लक्ष्य दिलं होतं यामध्ये कर्णधार रोहित शर्माने 33 धावांची खेळी केली. त्याच्यापाठोपाठ कायरन पोलार्डने 15 चेंडूत 21 धावांची खेळी केली होती. मात्र  त्रिपाठी- अय्यर जोडीने मुंबईच्या गोलंदाजांचा घाम फोडला आणि सामना मोठ्या फरकाने जिंकून दिला.

थोडक्यात बातम्या- 

“महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे तरच…”

‘पोलिसांनी मला राहत्या घरी कोंडलं’; सोमय्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार करणार

‘कोरोना विषाणूची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही’; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

“अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! महिला पोलिसांच्या ड्यूटीच्या तासांमध्ये केला मोठा बदल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More