बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फॅबुलस ड्युपलेसी! अंतिम सामन्यात फाफची 86 धावांची धमाकेदार खेळी, कोलकाताला ‘इतक्या’ धावांचं लक्ष्य

 मुंबई | 2021 च्या आयपीएलचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरू आहे.  या सामन्यामध्ये चेन्नईने कोलकाताला 193 धावांचं लक्ष्य दिलं आहे. चेन्नईकडून फाफ ड्युपलेसीने सर्वाधिक 86 धावा करत मोलाची भूमिका बजावली.

कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत कोलकाताच्या गोलंदाजांचा घाम काढला. सलमीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युपलेसीसने आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र अनुभवी सुनील नरेनने ऋतुराजला बाद करत  कोलकाताला पहिल यश मिळवून दिलं.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रॉबिन उथप्पानेही आक्रमक फलंदाजी केली. अवघ्या 15 चेंडूत 30 धावा केल्या, यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. त्यासोबतच मोईन अलीनेही छोटेखानी धमाकेदार खेळी केली. 20 चेंडूत 37 धावा केल्या यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकार मारले.

दरम्यान, कोलकाताच्या गोलंदाजांमध्ये सुनील नरेनने दोन गडी बाद केले. त्यासोबतच शिवम मावीने 1 गडी बाद केला, मात्र इतर गोलंदाज अपयशी ठरले. कोलकाता हे लक्ष्य पार करत विजेतेपदावर नाव कोरतं तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरतं की  हे नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे ‘प्रबोधनकार ठाकरे’ इज बॅक”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

उद्यापासून राज्यात मुसळधार पाऊस! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

अफगाणिस्तानात पुन्हा मृत्यूतांडव! तीन बॉम्बस्फोटात तब्बल ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

“सत्तेचं व्यसन हा अमली प्रकार, या अमली प्रकाराचा बंदोबस्त कुणी करायचा?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More