गौतम गंभीरच्या खेळीनं कोलकात्याचा हैदराबादविरुद्ध विजय

Photo- BCCI

बंगळुरु | कर्णधार गौतम गंभीरच्या धडाकेबाज खेळीमुळे कोलकात्याने हैदराबादवर ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकात्याचा संघ अंतिम सामन्याच्या तिकिटासाठी मुंबईशी दोन हात करणार आहे.

तत्पूर्वी, हैदराबादने या सामन्यात २० षटकात १२८ धावा केल्या. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे कोलकात्याला विजयासाठी ६ षटकात ४८ धावांचं आव्हान देण्यात आलं. मात्र कोलकात्याची ३ बाद १२ अशी बिकट अवस्था असताना गंभीरने १९ चेंडूत ३२ धावांची खेळी केली.