Konkan Expressway | कोकण एक्स्प्रेसवेच्या (Konkan Expressway) कामाची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या एक्स्प्रेसवेचे काम वेगाने सुरू असून, जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा एक्स्प्रेसवे सुरू झाल्यानंतर मुंबई आणि गोवा (Mumbai Goa) दरम्यानचा प्रवास अवघ्या 6 तासांवर येणार आहे. 498 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेसवे प्रवासाचा वेळ तर कमी करेलच, शिवाय पर्यटनालाही चालना देईल.
कोकण एक्स्प्रेसवे-
498 किलोमीटर लांबीच्या या एक्स्प्रेसवेमध्ये 41 बोगदे आणि 21 पूल बांधले जात आहेत. या एक्स्प्रेसवेमुळे गोवा आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ 12 तासांवरून फक्त 6 तासांवर येईल. हा एक्स्प्रेसवे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन प्रमुख जिल्ह्यांतील अनेक गावांमधून जाणार आहे.
एक्स्प्रेसवे ‘या’ गावांतून जाणार:
कोकण एक्स्प्रेसवे महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक शहरांमधून जाईल. महाराष्ट्रातील माणगाव, पनवेल, पेण, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर ही प्रमुख शहरे आणि गावे या मार्गावर येतील. तर गोव्यातील म्हापसा, पेडणे, मडगाव, पणजी, काणकोण आणि केनाकोना या शहरांमधून हा एक्स्प्रेसवे जाईल. या एक्स्प्रेसवेचे बांधकाम 2011 मध्ये सुरू झाले होते आणि जून 2025 पर्यंत तो सुरू होण्याची शक्यता आहे. (Konkan Expressway)
वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि डिझाईन:
कोकण एक्स्प्रेसवे ज्या भागातून जात आहे तिथे डोंगर, नद्या आणि घनदाट जंगले आहेत. कोकण क्षेत्रातील आव्हानात्मक भूप्रदेश लक्षात घेऊनच या एक्स्प्रेसवेची रचना करण्यात आली आहे. बोगदे, उन्नत रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून या एक्स्प्रेसवेवरून प्रवास करता येईल. हा एक्स्प्रेसवे पर्यटनाला चालना देईल, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.
कोकण एक्स्प्रेसवे: विकासाला गती देणारा दुवा:
हा एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्यावर कोकणातील पर्यटन, उद्योग आणि दळणवळण या क्षेत्रात क्रांती घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक्स्प्रेसवे वरदान ठरेल. तसेच, या भागातील शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योजकांनाही याचा फायदा होईल. (Konkan Expressway)
Title : Konkan Expressway Bridging the Gap Between Mumbai and Goa