Raj Thackeray l येत्या 4 जूनला राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. अशातच आता पदवीधर निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत मनसेने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अभिजीत पानसे याना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगली आहे.
भाजपला सर्वात मोठा धक्का :
महायुतीत विधानसभेचं बिगुल वाजण्याआधीच जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. अशातच आता राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
कोकण पदवीधर हा भाजप पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ समजला जात आहे. मात्र याच कोकण पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार देखील आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपला कोंडीत पकडल्याची राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
Raj Thackeray l मनसे उमेदवार मागे घेणार का? :
कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलै 2024 ला मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीमुळे, यंदाही भाजपचे आमदार निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती.मात्र ऐनवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या मिठाचा खडा पडल्याच्या चर्चा रंगात आहेत.
मात्र अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेकडून अभिजित पानसेना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता भाजप मनसे उमेदवाराला माघार घेयला लावणार की मयूटीमधून निवणूक लढवणार याकडे सर्व राज्यच लक्ष लागलं आहे.
News Title – Konkan Graduate Constituency Election
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ तीन राशींच्या कुंडलीत होणार मोठे बदल
अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..
सेल्फीच्या नादात नवविवाहितेने गमावला जीव; किल्ल्यावरून थेट..
“मराठीत बोलली म्हणून थेट धमकी..”; अभिनेत्रीने सांगितला लोकलमधील धक्कादायक अनुभव
“पुणे उद्ध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही”; धंगेकरांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं