बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी इथलं सौंदर्य पाहिलंय, कोकणाला जागतिक पर्यावरण केंद्र बनवणार”

सिंधुदुर्ग | राज्यातील विकासाच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उद्धाटन सोहळा आज पार पडला. याप्रसंगी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणाच्या विकासाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

चिपी विमानतळाच्या उद्धाटना सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यावेळी आपल्या भाषणात कोकणाला पर्यावरणात जागतिक स्तारावर घेऊन जाणार असल्याचं म्हणाले आहेत. कोकणाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा फायदा आपण येणाऱ्या काळात येथील विकास कामांसाठी करणार असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

निळे पाणी, लाल माती, मनमोहक समुद्र किनारा कोकणाला अधिक समृद्ध करत आहे. विमानातून मी जेव्हा येथील सौंदर्य पाहिलं तेंव्हा या ठिकाणी अजून आपल्याला भरपूर विकास करता येणार असल्याचं वाटलं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते यांच्यात चांगलीच टोलेबाजी या कार्यक्रमात रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. कोकणात जगातून अधिकाधिक पर्यटक भेट द्यायला यावेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही”

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही आर्यनला पाठिंबा?, अरविंद सावंतच्या वक्तव्यानं खळबळ

‘शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात’; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

राजू शेट्टींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले…

अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More