न्याय मिळाला पण माझी छकुली नाही हो भेटली!, निर्भयाच्या आईचा टाहो

अहमदनगर | माझ्या छकुलीला न्याय मिळाला पण ती मला परत कधीच भेटणार नाही, अशी प्रतिक्रिया देत कोपर्डीतील निर्भयाच्या आईला अश्रू अनावर झाले.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी निकालात तिन्ही आरोपींना अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यामुळे कोपर्डीतील निर्भयाला खऱ्या अर्थानं न्याय मिळालाय.

निकालासाठी निर्भयाचे आई-वडील, नातेवाईक आणि अन्य बऱ्याच लोकांनी कोर्टाच्या आवारत गर्दी केली होती. निकालानंतर सगळीकडून समाधान व्यक्त होताना दिसतंय. परंतु आपली लेक आता परत कधीच भेटणार नाही ही खंत त्या माऊलीला कायम राहिलीय.