कोपर्डी प्रकरण हा काही दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा नाही!

अहमदनगर | कोपर्डी प्रकरण हा काही दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा नाही. त्यामुळे मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा देऊ नये, असा युक्तिवाद त्याचे वकील योहान मकासरे यांनी केलाय. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेबाबत युक्तिवादाला सुरूवात झाली.

जितेंद्र शिंदे त्याच्या पत्नीसाठी एकमेव आधार आहे. त्याला फाशी ऐवजी जन्मठेप द्यावी, अशी विनंती त्याचा वकिलांनी केलीय.

नितीन हा बीएसस्सीचा शेवटच्या वर्षातील विद्यार्थी असून दलित कुटुंबातून आलेला तसेच कुुटुंबाला एकमेव आधार आहे, असा युक्तिवाद दोषी नितीन भालूमेेचे वकील प्रकाश अहिर यांनी केला.