बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिघांना उलटं लटकवून त्यांच्यावर कुत्रे सोडा, त्यांचे लचके तोडा!

अहमदनगर | माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले. तसं त्यांना उलटं टांगून त्यांच्यावर कुत्रे सोडा आणि त्यांचे लचके तोडा, अशी मागणी कोपर्डीच्या पीडितेच्या आईनं केलीय. कोपर्डीच्या नराधमांना दोषी ठरवल्यानंतर त्या बोलत होत्या. 

21-22 तारखेला जो न्याय होईल तो फक्त फाशीचाच झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मराठा समाजातील सर्व संघटना, उज्ज्वल निकम, पोलीस अधिकारी तसेच भय्यूजी महाराज यांचे त्यांनी आभार मानले. 

दरम्यान, आमच्या गावात पुन्हा भांडणं झाली आहेत, अॅट्रॉसिटीच्या केस सुरु आहे, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिलीय. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More