कोपर्डीतील पीडितेच्या स्मारकास संभाजी ब्रिगेडचा विरोध

पुणे | कोपर्डीतील बलात्कार पीडित श्रद्धा सुद्रीकच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवलाय. यासंदर्भात पुण्यात निदर्शनं करण्यात आली तसेच कोपर्डीत होणारा स्मारक अनावरणाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय.

भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवारातर्फे कोपर्डीत पीडितेचं स्मारक उभं राहतंय. मात्र स्मारक शौर्याचं प्रतिक असतं, मग पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचं स्मारक कसं?, असा सवाल ब्रिगेडनं विचारलाय. 

दरम्यान, संभाजी ब्रिगेडकडून पुण्यात भय्यू महाराजांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

 1. *कोपर्डीमध्ये* गावकऱ्यांनी वर्षभरात एकही सण साजरा केलेला नाही. कारण हा अती संवेदनशील विषय आहे. मग गावात गंभीर घटनेचे स्मारक कशाला…! *कोपर्डीतील स्मारक अखेर रद्द…*

  *भैय्युमहाराज कोपर्डीत फिरकलाच नाही.*

  निर्भयाच्या आठवणींने महाराष्ट्र रोज हळहळतोय… बलात्कार व निर्घूण हत्या प्रेरणादाई नाही तर… प्रचंड चिड आणणारी आहे. याचा अर्थ… महिला आजही १००% सुरक्षित नाही. महाराज, मग स्मारकाच्या गप्पा कशाला.? विचार करावा. *कोपर्डीतील बलात्कारी नराधमांना तात्काळ फाशी मिळालीतरच खरी श्रध्दा’जंली ठरेल…!*

  भैय्यु… दणका संभाजी ब्रिगेडचा…

  *- संतोष शिंदे,*
  संभाजी ब्रिगेड, पुणे

Comments are closed.